• कथा-ग्रामदेवतेची: यात्रा उत्सव आणि नवरात्रीची

    Story by: Mahadu Chindhu Kondar Read the translated story in English नमस्कार मंडळी, इतिहासाच्या बाबतीत नेहमी असं म्हटलं जातं की, “History is the guide of man” and ” history is the lamp of experience”! म्हणून मी माझ्या ग्रामदेवतेची कथा आपल्या समोर मांडणार आहे. ही कथा मला माझे आई-वडील व गावातील प्रौढ माणसांनी सांगितली. ही कथा बदलत्या युगानुसार पुढील येणार्‍या पिढ्यांना कळावी, समजावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न…! खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पुरूषवाडी गावात जाखुबाई व हनुमान मंदिर ही दोन देवळे अस्तित्वात होती. अज्ञान, अंधश्रध्दा, शिक्षणाचा अभाव पण रूढी-परंपरा व संस्कृती, माणुसकी जपणारी माणसं या गावात नांदत होती. लोक सांगतात की, १५० ते २०० वर्षांपूर्वी  गावात महामारीचे दुखणे आले. (उदा.आजच्या काळातील…